Friday, November 27, 2009

एक वर्ष झालं.

एक वर्ष झालं,

हुतात्म्यांना जाऊन ,
आम अदमीला होरपळुन ..
नराधमांना यमसदनास पाठवुन..

तेच ते राजकारण,
त्याच त्या मेणबत्त्या...
तोच तो आरडा-ओरडा ..

सुरक्षा प्रणालीत काही फारसा फरक नाही..
मृतांना अजुन अर्थसहाय्य नाही...

राजीनामा देणारे परत कामाला लागलेत..
निमीषमात्र ऊभेराहुन श्रध्दांजली वाहुन गेलेत..

करणारा शेजारचा उलटा करतो शीरजोरी..
त्याला काही बोलण्याची देखील चोरी ..

पुन्हा सगळं "जैसे थे" !!!
एक वर्ष झालं. एक वर्ष झालं. !


काय होणार भारताचं .. :.(

0 comments: